Pune News : सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन; पुणे पोलीस दलावर शोककळा

Pune News : पुणे शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. १५ जानेवारी रोजी पाय घसरून तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले होते, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानचा त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शहर पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

अशोक धुमाळ हे सातारा  जिल्ह्याचे सुपुत्र होते. पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी राज्यातील विविध शहरांमध्ये काम केले होते. गेल्यावर्षीच त्यांची पुणे शहर सहायक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते पुण्यातील कात्रज परिसरात वास्तव्यास होते.

Ravindra Dhangekar : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

१५ जानेवारी रोजी पाय घसरून तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले होते. त्यांच्या पायाला आणि बरगड्यांना फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्यावर भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर साध्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते.

परंतु प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी रूबी हॉल क्लिनिकमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास धुमाळ यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply