Pune News : पोहण्याचा मोह बेतला जीवावर; खाणीतील पाण्यात बुडुन दोन १२ वर्षांच्या मुलांचा मृत्यू, वाघोलीत घटना

Pune News : पुण्यातील वाघोली  येथे एक हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. दोन बारा वर्षाच्या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. वाघोली येथील शिवरकर वस्ती परिसरातील खाणीतील पाण्यात दोन १२ वर्षाचे मुले बुडाले आहेत. 

वाघोली पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने या मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अली अहमद शेख आणि कार्तिक दशरथ डूकरे (दोघेही रा शिवरकर वस्ती, वाघोली) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या वखारीला भीषण आग, होरपळून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

नक्की काय घडलं

तीन मुले पोहण्यासाठी येथील शिवरकर वस्ती परिसरातील खाणीत गेले होते. त्यातील दोन मुले पोहण्यासाठी खाणीततील पाण्यात उतरले, तर तिसरा मुलगा बाहेरच होता.

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात उतरलेले दोघेजण बुडाले. तिसऱ्या मुलाने जाऊन ही माहिती नातेवाईकांना सांगितली. नंतर नातेवाईकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी अग्निशामक दलाला कळविले. एका स्थानिक व्यक्तीने एक तर अग्निशामक कर्मचाऱ्याने दुसरा मृतदेह बाहेरकाढला.

सावधगिरी बाळगणं आवश्यक

या घटनेमुळं दोघांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळं शिवरकर वस्तीमध्ये हळहळ व्यक्त केली  जातेय. लहान मुलांना पाण्याचे चांगलेच आकर्षण असतं. या दोघानांही पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी पाण्यात उतरण्याअगोदर सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. पालकांशिवाय लहान मुलांनी असा प्रयत्न करणं टाळावं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply