Pune : 1 जानेवारीला पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार, वाहतूक पोलिसांनी दिले पर्यायी मार्ग

Pune : नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी रोजी पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रोड बंद राहणार आहे. नववर्षानिमित्त शिवाजी रस्त्यावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

नववर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवाजी रस्ता वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Ration Shopkeepers Strike : 1 जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर; सामान्यांचे हाल होण्याची शक्यता

शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौकमार्गे टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जावे, असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.  

जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनाकडे जाणारा मार्गदेखील वाहनांसाठी बंद असणार आहे. या मार्गावरील वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, महापालिका भवनमार्गे इच्छितस्थळी जावे, असं वाहतूक पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply