Pune News : भारत गौरव रेल्वेमधील प्रवाशांना अन्नातून विषबाधा; तब्बल ४० जण रुग्णालयात, प्रशासनाची धावपळ

Pune News : चेन्नईकडून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव यात्रा रेल्वेमधील प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याची प्राथामिक माहिती आहे. सर्व प्रवाशांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सध्या सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, विषबाधेच्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भारत गौरव यात्रा रेल्वे चेन्नईहून पुण्याकडे येत होती़. मध्यरात्रीच्या सुमारास ही विशेष रेल्वे गाडी पुणे रेल्वे स्टेशनला आली.

Chembur Cylinder Blast News : सिलिंडरच्या स्फोटाने घर कोसळलं; चेंबुरमधील थरारक घटना, ४ जखमी

 

तेव्हा ट्रेनमधील काही प्रवाशांना अचानक उलट्या तसेच मळमळीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरच त्यांच्यावर प्राथामिक उपचार करण्यात आले. त्यानंतर या प्रवाशांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सध्या रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील पेन्ट्री कार काढून टाकण्यात आल्या असल्या तरी या विशेष गाडीमध्ये खानपान सुविधा देण्यात आली आहे. मात्र, तरी सुद्धा प्रवाशांना ताजे अन्न मिळत नसल्याच्या तक्रारी अनेकवेळा करण्यात आल्या आहेत.

अनेकदा सकाळचे फुड पॅकेट हे सायंकाळी, रात्री देण्यात येते. त्यातून अशा दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुन्हा पेन्ट्रीकार सुरू कराव्यात, अशी विनंती रेल्वे प्रवासी ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply