Pune News : हडपसरचा पूल सुरक्षीत, वाहतूक सुरू

हडपसर : लोड टेस्टींगमध्ये येथील उड्डाणपूल वाहतूकीस सक्षम असल्याचे दिसल्याने आज (ता. १२) साडेपाच वाजण्याच्या दरम्यान तो वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे पुलाखालील पर्यायी मार्गावरील कोंडी मोकळी होऊन वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे.

गेल्यावर्षी हडपसर येथील उड्डाणपूलाची दुरुस्ती करण्यात आली होती. या दुरूस्तीनंतर पुलाची सध्याची क्षमता तपासणीसाठी दोन दिवस पुलावरील पुणे ते सोलापूर व सासवड मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

आय.आर.सी. च्या नियमानुसार उड्डाणपूलावरील लोड टेस्टिंग करण्याचे काम करण्यात आले आहे. यामध्ये हा उड्डाणपूल वाहतुकीला सक्षम व सुरक्षीत असल्याचे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हा पूल वाहतुकीला बंद केल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून पुलाखालील रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती. सर्व प्रकारची वाहने येथून प्रवास करीत असल्याने या भागात दोन दिवस मोठ्याप्रमाणात वाहतूकोंडी झाली होती.

आज सायंकाळी साडेपाच वाजता उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुलाखालील वाहतुकीचा ताण कमी होऊन प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply