Pune News : 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटले..' रवींद्र धंगेकर यांचा मोठा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Kasaba Peth By Election: पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचे मतदान काल पार पडले. मतदान पुर्ण झाले तरी आरोप प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरूच आहे. कसब्यातील भाजप उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी मतदान कक्षात चिन्ह असलेले उपरणे वापरल्याने गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली होती.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांनीही उपोषण केल्याने आचार संहितेचा भंग झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर आता रविंद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात पैसे वाटले आणि ज्या घरात पैसे वाटले ते घरं माझं होतं. पैसे वाटप केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर ,चंद्रकांत पाटलांवरही निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करावा. माझ्यावरचं अन्याय का? हा पक्षपातीपणा कशासाठी?" असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

"कसबा पोटनिवडणुकीत मी 15 ते 20 हजार मतांनी निवडून येणार आहे. मी कार्यकर्ता आहे. मला विजयाचा विश्वास आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडून येणं शक्य नसल्यानेच पुण्यात पैसे वाटप केलं गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंंगली आहे.

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत 1 लाख 37 हजार 18 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. येत्या 2 मार्च रोजी कसबा आणि चिंचवड निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply