Pune News : बँकेच्‍या लोन कॉन्‍सीलरची बनवाबनवी; बँकेची ४७ कोटी रूपयांची फसवणूक

पुणे : स्टेट बँक ऑफ इंडियाचा ऑटो लोन कॉन्सिलर असलेल्या एका व्यक्तीनेच बँकेची तब्बल ४७ कोटी ६५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युनिव्हर्सिटी रोड शाखा आणि टिळक रोड शाखेत हा प्रकार घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या युनिव्हर्सिटी शाखा आणि टिळक रोड शाखेत २०१७ ते २०१९ या कालावधीत मंजूर करण्यात आलेली ४६ वाहन कर्ज प्रकरणे संशयित असल्याचे ऑडिटमध्ये निष्पन्न झाले होते. हे वाहन कर्ज करून देणारे बँकेचे ॲटो लोन कौन्सिलर आदित्य शेठ व त्यांच्या इतर साथीदारांनी कटकारस्थान करून बँकेची फसवणूक  केली. खोटे व बनावट कोटेशन टॅक्स इन्व्हाईस मार्जिन आणि फुल पेमेंटच्या रिसीट तयार करून ते खरे असल्याचे भासवले.

कर्ज मंजूर करत रक्‍कम वर्ग

बँकेतून मोठ्या रकमेचे वाहन कर्ज मंजूर करून घेतले. त्यातील काही प्रकरणात सुरुवातीला इतर खात्यावर रक्कम वर्ग केली. नंतर संबंधित वाहन कर्जदार यांच्या नावावर ही रक्कम वर्ग करत बँकेची ४७ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांनी फसवणूक केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. आदित्य नंदकुमार शेठिया याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply