Pune New Collector : पोलिस आयुक्तानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले; राजेश देशमुख यांच्या जागी सुहास दिवसे यांची नियुक्ती

Pune New Collector : पुण्याचे पोलिस आयुक्त बदलण्यात आल्यानंतर आता जिल्हाधिकारी देखील बदलण्यात आले आहेत. पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. राजेश देशमुख हे आधी पुण्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांच्या जागी आता सुहास दिवसे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुहास दिवसे यांच्या जागी डॉ. राजेश देशमुख यांची क्रीडा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य सरकारने आज काढले आहेत. दिवसे यांनी विद्यमान जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडून तत्काळ पदभार स्वीकारावा असेही आदेश राज्य सरकारने दिले आहे.

EVM Machine Theft Case : पुरंदर EVM मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठी कारवाई

दिवसे हे सध्या राज्याचे क्रीडा आयुक्त म्हणून कार्यरत होते. दरम्यान, पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची दिवसे यांच्या जागेवर नवीन क्रीडायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सुहास दिवसे यांनी याआधी पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जवळील अधिकारी म्हणूनही दिवसे यांचे नाव घेतले जाते. दिवसे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply