Pune-Nashik Railway : पुणे-नाशिक प्रवास सुकर होणार; हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

Devendra Fadnavis  : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाने दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळाल्याची माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याबद्दल मी केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांचा अतिशय आभारी आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल'.

त्याचबरोबर 'पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वेसाठी १३,५३९ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आभार व्यक्त करतो'.

दरम्यान, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला तत्वत मान्यता मिळाल्याचे स्वागत खासदार अमोल कोल्हे यांनी केलं. मात्र या प्रकल्पातील काही बाबींची अद्यापही स्पष्टता दिली जात नसल्याची नाराजी व्यक्त करत हा रेल्वे प्रकल्प ब्रॉडगेजवर हा प्रकल्प व्हायला हवा. कारण औद्योगिक, शेतमाल वाहतुकीसाठी हा रेल्वे प्रकल्प महत्वाचा असल्याचे मत कोल्हे यांनी मांडत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply