Pune–Nagpur Vande Bharat : वंदे भारत ट्रेनमध्ये मोठा बदल; पुणे–नागपूर मार्गासाठी रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय

Pune–Nagpur : पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे असा रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या सोयींमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे - अजनी वंदे भारत एक्स्प्रेस वेळापत्रकात रेल्वे प्रशासनाने बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुसाट आणि कमी वेळात होईल.

पुणे ते नागपूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही महाराष्ट्रातील १२ वी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. अजनी- पुणे वंदे भारत एक्स्प्रेसच्या सार्वजनिक वेळेमध्ये अंशतः सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस अजनी आणि पुणे दरम्यान धावते. सुधारित पीपीटीनुसार, ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे - अजनी वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या प्रमुख स्थानकांवर तिच्या विद्यमान वेळापत्रकापेक्षा लवकर धावेल.

Baramati : बहिणीची छेड काढल्याबद्दल भावावर कोयत्याने हल्ला; बारामतीत खळबळ, वर्षभरानंतर प्रकरणात महत्त्वाचा टप्पा

सुधारित वेळेनुसार, अकोला, बडनेरा आणि वर्धा स्थानकांवर या ट्रेनचे आगमन आणि प्रस्थान वेळा लवकर असतील ज्यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचेल. सुधारित वेळापत्रक २६ डिसेंबर २०२५ पासून लागू होईल. सुधारित वेळापत्रकानुसार, ही ट्रेन अकोला आणि बडनेरा रेल्वे स्थानकांवर सुमारे १० मिनिटे लवकर पोहोचेल आणि निघेल आणि वर्धा स्थानकावरही वेळेच्या आधी पोहचेल.

वंदे भारत एक्स्प्रेसच्या सुधारीत वेळापत्रकामुळे ट्रेनच्या एकूण वेळेमध्ये आणि कार्यक्षमतेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे - अजनी वंदे भारत एक्स्प्रेसचे नवीनतम सार्वजनिक वेळापत्रक तपासण्याचा सल्ला दिला आहे. ट्रेनचे वेळापत्रक तपासूनच प्रवाशांनी प्रवास करावा असा सल्ला देण्यात आला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *