Pune-Mumbai Rain : पुढचे २४ तास धोक्याचे, हे आहे पावसाचे कारण

पुणे : हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर प्रदेशामध्ये कमी दाबाचा पट्टी अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे वाहत आहे. त्यात गुजरात मधील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासात पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून पुण्या-मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविण्यात आली आहे.

सततच्या पावसामुळे या दोन्ही शहरात सखल भागात पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्यास ओढ्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तसेच, रस्ते जलमय होत, ते खचण्याची किंवा खड्डे पडण्याचा धोका हवामान खात्याने वर्तविला आहे. रस्ते निसरडे झाल्यामुळे वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच या काळात घाटमाथ्यासह बाधित क्षेत्रात जाण्याचे टाळावे, अशी सूचना भारतीय हवामान खात्याने केली आहे.
 
पुणे शहरात दिवसभर संततधार कायम राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी. पश्चिम महाराष्ट्रातील सततच्या पावसामुळे धरणांतील विसर्ग वाढविण्यात येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या नागरींकानी विशेष काळजी घ्यावी. पुढील चोवीस तास पुण्या- मुंबईसाठी निश्चितच आव्हानात्मक राहणार आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply