सिंहगड एक्स्प्रेसमध्ये संतापजनक प्रकार, व्हिडिओ शूटिंग करत महिलांची छेड, प्रवाशांनी दिला चोप; आरोपी मदरशामधील शिक्षक

कल्याण :  पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस  दोन दिवसांपासून एक संतापजनक प्रकार सुरू आहे.. एक विकृत प्रवासी लपूनछपून महिला प्रवाशांचे व्हिडीओ काढत होता. त्याला प्रवाशांनी रंगेहात पकडलं. ट्रेन कल्याण स्थानकात पोहोचल्यावर प्रवाशांनी या विकृत व्यक्तीला पोलिसांच्या हवाली केले आहे. आरोपी मदरशामधील शिक्षक आहे.  लोहमार्ग पोलिसांनी मोहम्मदवर विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 

पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांचे व्हिडिओ शूटिंग करून महिलांची छेड काढणारा व्यक्ती प्रवाशांनी रंगेहात पकडून दिला पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.  मोहम्मद अश्रफ असे व्हिडीओ काढणाऱ्या  प्रवाशाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती असे प्रकार करत होता. आज  व्हिडिओ काढताना रंगेहात पकडला. त्यानंतर प्रवाशांनी त्याला चांगला चोप दिला.

धावत्या ट्रेनमध्ये हा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांनी लगेच टिसीच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यानंतर टिसीने कल्याण पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती  दिली. तोपर्यंत प्रवाशांनी त्याला पकडून ठेवले होते. स्थानकावर गाडी येताच कल्याण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.  कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रवाशांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. हा प्रकार कर्जत येथे घडल्याने हा गुन्हा व आरोपी कर्जत रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून हा इसम या गाडीने ये जा करत सहप्रवासी महिलांचे व्हिडिओ तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

या आधी विमान प्रवासात सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याची घटना समोर आली होती. दारूच्या नशेत असलेल्या प्रवाश्याने सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका करून तिच्याशी गैरवर्तनही केलं होते. दरम्यान आता रेल्वे प्रवासातही अशीच घटना समोर आल्यानं प्रवासातल्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. रेल्वेमधून अनेक सामान्य नागरिक दररोज प्रवास करतात. बरेचदा काही महिला प्रवासी एकट्यानंही प्रवास करतात. अशा नागरिकांचा त्रास प्रवाशांना होऊ शकतो. याबाबत रेल्वेकडून कडक कारवाई करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply