Pune- Mumbai Expressway : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर दोन तासांचा वाहतूक ब्लॉक

Pune- Mumbai Expressway : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी बारा ते दोन या वेळेत दोन तासांचा ब्लॉक असेल. या दरम्यान पुण्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 

आयटीएमएस अंतर्गत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक घेतला जात आहे. त्यामुळे सोमटने फाटा जवळ गॅन्ट्री बसविण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून असे ब्लॉक घेतले जातायेत. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडालीये. पुढील काही महिने असेच ब्लॉक घेतले जाणार आहेत, आशी माहिती देखील समोर आलीये.

Parbhani Maratha Andolan : परभणीत मराठा आंदाेलक आक्रमक, पूर्णा तहसील कार्यालयास लावली आग, सतर्कतेमुळे अनर्थ टळला

ब्लॉकवेळी सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. या दरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन एमएसआरडिसी आणि महामार्ग पोलिसांनी केलेलं आहे.

कशी वळवणार वाहतूक ?

मुंबईहून पुणेकडे जाणारी सर्व वाहने एन. एच. 4 जुना मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येणार आहेत. तर हलकी वाहने उर्से टोलनाक्यावरून तळेगाव चाकण लेनने उसे खिंड वडगाव फाटा चौक मार्गे एन. एच. 4 जुना मुंबई-पुणे महामार्गकडे वळवली जाणार आहे. या रस्त्यावरून पुढे वाहने पुणेच्या दिशेला मार्गस्थ करण्यात येणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply