Pune : MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात 14 तासांपासून आंदोलन; स्ट्रीट लाईट बंद, तरी हटले नाहीत मागे!

युवक काँग्रेसतर्फे पुण्यात काल पुन्हा एमपीएससी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. काल सकाळी 10 वाजता बालगंधर्व चौक येथे एमपीएससी निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित राहिले होते. गेल्या 14 तासंपासून हे आंदोलन सुरू आहे.

तर पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणचा स्ट्रीट लाईट काल रात्री बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च लावत आंदोलन सुरूच ठेवल्याचे दिसून आले.

आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणचा स्ट्रीट लाईट बंद करण्यात आलेल्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी जयंत पाटीलांचं स्वागत विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावून केलं. दरम्यान, पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी स्ट्रीट लाईट बंद केल्या असल्या तरी विद्यार्थी आंदोलनावर ठाम होते आणि काळोख्या अंधारात देखील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच ठेवले होते.

दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी एमपीएससीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. तर राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे. आमदार रोहीत पवार यांनी यासंबधी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ट्विटमध्ये रोहीत पवार म्हणतात की, "#MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलन स्थळाचे स्ट्रीटलाईट बंद करण्याऐवजी विद्यार्थ्यांशी संवाद साधा, त्यांना न्याय द्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी त्यांना त्रास व्हावा म्हणून लाईट बंद करणाऱ्या कपटी सरकारचा #जाहीरनिषेध विद्यार्थ्यांना गृहीत धरू नका,खूप महागात पडेल" असं ट्विट करत त्यांनी विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याबाबत आयोगाने अंबलबजावणी केली नाही म्हणून विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन पुकारले आहे. काही दिवसांपूर्वी शेकडो विद्यार्थ्यांनी पुण्यातील टिळक चौकात नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांनी देखील सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांच्या मागील आंदोलनावेळी मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू होईल असं जाहीर केलं होतं. मात्र, याची अंबलबजावणी आणि ठोस भूमिका आयोगाने घेतली नसल्याने विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply