Pune MNS News : वैद्यकीय महाविद्यालयाची तोडफोड भोवली, पुण्यात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Pune  : पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ आशिष बंगिनवार यांच्या कार्यालयाची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांनी काल केली होती. याप्रकरणी आता पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याला (डीन) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) अटक केली होती. या संबंधित जाब विचारण्यासाठी मनसेकडून काल महाविद्यालयात आंदोलन करण्यात आले.

यावेळी मनसेने त्यांच्या खळखट्याक पद्धतीने आंदोलन करत बंगिनवार यांच्या केबिनची तोडफोड केली. या तोडफोडीमध्ये दोन कॉम्प्युटर आणि खुर्च्यांचे नुकसान झाले होते. 

या प्रकरणी मनसेच्या आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, धनंजय गवळी आणि इतर ५-६ जणांवर सार्वजनिक संपत्तीस हानी पोहचवली म्हणून गुन्हा दखल करण्यात आला आहे.

महाविद्यालयात झालेल्या भ्रष्टाचार संदर्भात जाब विचारण्यासाठी आमदार रविंद्र धंगेकर देखील तेथे पोहोचले होते. कार्यकत्यांनी बंगिनवार यांच्या पाटीला काळे फासले होते. 

Chhatrapati Sambhajinagar : पैशाच्या वादातून गोळीबार! भररस्त्यात तरुणाला संपवलं; छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी सुमारे १५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी २२ लाख रुपये शुल्क आहे. मात्र त्या व्यतिरिक्त २० लाख रुपये देण्याची मागणी बंगिनवार यांनी एका विद्यार्थिनीच्या पालकांकडे केली होती.

त्या विद्यार्थिनीच्या पालकांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने बंगिनवार यांना ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला होता. तक्रारदार यांच्याकडून पैसे स्वीकारताना त्यांना पकडले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply