पुण्यात MIT मध्ये दुर्घटना, हॉस्टेलमध्ये महिलेचा मृत्यू, लोणी काळभोरमध्ये हळहळ


Pune MIT hostel accident : लोणी काळभोर येथील एमआयटी शिक्षण संस्थेच्या हॉस्टेलमध्ये महिलेचा विजेचा करंट लागून मृत्यू झाला आहे. हॉस्टेलमध्ये अटेंडंट म्हणून कार्यरत असलेल्या ३४ वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत महिलेचे नाव शामल संतोष आगाव (वय 34, रा. गोपाळपट्टी, हडपसर, मूळ रा. बीड) असे आहे. या घटनेमुळे आगाव कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शामल आणि त्यांचे पती संतोष आगाव दोघेही एमआयटी शिक्षण संस्थेत नोकरी करत होते. शामल या डिझाईन कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये अटेंडंट म्हणून काम पाहत होत्या. मागील दोन-तीन दिवसांपासून हॉस्टेलच्या नळाला हलका करंट येत होता, याबाबत त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली होती. मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष झाले. आज सकाळी शामल टेरेसवरील सोलर आणि पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यासाठी एकट्याच गेल्या. तिथे पाण्याच्या प्रवाहातून जोरदार करंट लागल्याने त्या जागीच कोसळल्या.

काही वेळाने एका कर्मचाऱ्याला त्या निपचित अवस्थेत आढळल्या. त्यांनी तातडीने वरिष्ठांना कळवले आणि शामल यांना विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शामल यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेने हॉस्टेलमधील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply