Pune Metro : खुशखबर! पुणे मेट्रोच्या पिंपरी ते निगडीपर्यंत विस्ताराला केंद्राची मंजुरी, 33 स्थानके उभारली जाणार

Pune Metro : पुणे मेट्रोच्या पिंपरी ते निगडीपर्यंत विस्तारीकरणाला केंद्राने सोमवारी मंजुरी दिल्याने पिंपरी-चिंचवडवासीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते निगडी पर्यंत पसरलेला हा मार्ग एकूण 4.413 किमी अंतर व्यापतो आणि त्यात चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन स्थानकांचा समावेश आहे.

या मार्गासाठी एकूण प्रकल्प खर्च 910.18 कोटी आहे आणि या विस्ताराचे काम तीन वर्षे आणि तीन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या मंजुरीमुळे पुणे मेट्रोचे जाळे एकूण 37.613 किमी लांबीपर्यंत विस्तारणार असून, 33 स्थानकांचा समावेश होणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोचा स्वारगेट ते पीसीएमसी आणि पीसीएमसी ते निगडी असा विस्तार करण्याची मागणी केली जात होती. यासाठी पीसीएमसी ते निगडी या विस्तारित मार्गासाठी पुणे मेट्रोने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला होता. पीसीएमसीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य आणि केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला. सर्व तांत्रिक गरजा पूर्ण झाल्याची खात्री करून महामेट्रोने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. यानंतर सोमवारी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने याला अंतिम मंजुरी दिली.  

Nashik Crime News : नाशिकमध्ये रात्रीच्या अंधारात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; नदीपात्रात उतरुन कोट्यवधींचं ड्रग्स जप्त

याबद्दल बोलताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, "पीसीएमसी ते निगडी या मार्गाचा विस्तार करणे अत्यावश्यक आहे. यामुळे चिंचवड, आकुर्डी आणि निगडी हे मेट्रो नेटवर्कशी जोडले जातील. ज्यामुळे परिसरातील हजारो लोकांना फायदा होईल. वेळापत्रकानुसार 3 वर्षे आणि 3 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

- पीसीएमसी ते निगडी एकूण 4.413 किमी अंतर आहे.

- त्यात चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन स्थानकांचा समावेश आहे

- या मार्गासाठी एकूण प्रकल्प खर्च 910.18 कोटी आहे.

- तीन वर्षे आणि तीन महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

- या विस्तारामुळे, पुणे मेट्रोचे जाळे एकूण 37.613 किमी लांबीपर्यंत विस्तारेल, त्यात 33 स्थानके समाविष्ट होतील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply