Pune Metro construction : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! मेट्रोवरच डोळा; अडीच लाखांचं साहित्य लंपास

Pune Metro construction : पुण्यातील शिवाजीनगरमध्ये मेट्रो मार्गिकेचं काम सुरू असताना बांधकाम साहित्य चोरून नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल २ लाख ६० हजार रूपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेण्यात आलं आहे. चोरी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.

पुण्यात मेट्रो मार्गिकेचं बांधकाम साहित्य चोरून नेल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रधान (वय वर्ष २३) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रधान हे पुणे मेट्रो कंपनीत सिक्युरिटी सुपरवाइझर पदावर कार्यरत आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना चोरट्यांनी अडीच लाख रूपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून पळ काढला. त्यांनी ही चोरी कामगार पुतळा भागातून केली असल्याचं समोर आलं आहे.

Pune News : कोथरूडमध्ये ४७ डुकरांचा मृत्यू कसा झाला?, मृत्यूमागचं कारण आलं समोर

ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक राजकुमार केंद्रे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, यापूर्वी देखील मेट्रो मर्गिकेवरील साहित्य चोरी गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.शिवाजीनगर, चतुशृंगी तसेच खडकी भागात अशा घटना घडल्या आहेत. आतापर्यंत चोरट्यांनी मेट्रो मर्गिकेच्या कामाच्या ठिकाणावरून लाखोंचे साहित्य चोरून नेले असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या चोरीच्या घटना आणि येथील कमकुवत सुरक्षा व्यवस्था देखील याला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply