Pune Metro : मेट्रोचा पिलर नेणाऱ्या भरधाव ट्रकनं मध्यरात्री तरुणाला चिरडलं; तरुणाचे दोन्ही पाय निकामी

Pune Metro :  पुण्यात अनेक ठिकाणी सध्या मेट्रोची कामं सुरु आहेत. यात रात्रंदिवस ही कामं केली जात आहे. त्यातच मेट्रोचं काम सुरु असताना दुर्घटना घडली आहे. मेट्रोच्या कामासाठी मोठा पिलर घेऊन निघालेल्या भरधाव ट्रकच्या धडकेमुळे रस्त्यावरुन चालत निघालेला हा तरुण ट्रक खाली येऊन हा अपघात घडलाय. यात एका तरुणाचे दोन पाय निकामी झाले आहेत.

Pune Car Accident : पुण्यातील ४९ पब, बारवर राज्य उत्पादन शुल्काची कारवाई; सुरेंद्र कुमार अग्रवालच्या घरावरही पोलिसांची छापेमारी

पुण्यातील बाणेर रस्त्यावर मेट्रोचं काम सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीतदेखील बदल करण्यात आले आहेत. त्यातच काल रात्री बाणेर परिसरात मेट्रोचं काम सुरु असताना दुर्घटना घडली. मेट्रोच्या कामासाठी रोज अनेक ट्रक पिलर घेऊन शहरात प्रवास करतात. त्यात रात्रीची वेळ असल्याने या ट्रकने स्पीड वाढवली आणि रस्त्यावरुन जात असलेल्या एका तरुणाला थेट धडक दिली. या धडकेत एका तरुणाच्या पायाला चांगलीच दुखापत झाली आणि दोन्ही पाय निकामी झाले. अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात दोन्ही पाय गेल्याने आयुष्यभरासाठी ब्रेक लागला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply