Pune Metro : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रिटर्न तिकीट सेवा 1 मार्चपासून होणार बंद

Pune Metro :  पुणे  शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी मेट्रो सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. परंतु मेट्रो व्यवस्थापन काही सेवांमध्ये बदल करत आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महामेट्रोकडून तिकीट सेवेत थोडासा बदल होत आहे, आपण त्याबद्दल जाणून घेऊ या.  

पुण्यात मेट्रोच्या परतीच्या प्रवासाची तिकीट सेवा होणार बंद आहे. महामेट्रोने परतीच्या प्रवासाची (रिटर्न) तिकीट सेवा येत्या 1 मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना जाताना आणि येताना वेगळे तिकीट काढावे लागणार आहे. या निर्णयामुळे आता मेट्रो प्रवाशांचे तिकिटांसाठी होणार हाल होणार आहेत.

Maval Lok Sabha : मावळमध्ये राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आणायचा; लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने कसली कंबर

 

परतीच्या प्रवासाची तिकीट सेवा

सध्या पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या ५५ हजार आहे. ही प्रवासी संख्या कमी आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढविण्यासाठी महामेट्रो सातत्याने पावले उचलत आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा, या उद्देशाने पुणे मेट्रोने प्रवाशांना परतीच्या प्रवासाची तिकीट सेवा दिली होती. पण १ मार्चपासून ही सेवा बंद करण्याचा निर्णय आता महामेट्रोने घेतला आहे.

महामेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना जाताना आणि येताना असं दोन वेळा तिकीट काढावं लागणार  आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मेट्रो स्थानकावर तिकीट खिडक्यांवर आता गर्दी वाढणार आहे.

महामेट्रोचा निर्णय

प्रत्येक मेट्रो स्थानकावर तिकीट खिडक्यांवर प्रवाशांची सकाळी आणि सायंकाळी गर्दी दिसून येते. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने प्रवाशा मेट्रोने अॅप, व्हॉट्सअॅप क्रमांक, एटीव्हीएम यंत्राच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सुविधाही दिलेली आहे. आधी महामेट्रोने प्रवाशांना तिकीट काढल्यानंतर २० मिनिटांत प्रवास करणं बंधनकारक केलं होतं.

अनेक प्रवासी तिकीट काढून मेट्रो स्थानकात जातात. आतमध्ये निवांत बसतात. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची गैरसोय  होते. यावर उपाय म्हणून महामेट्रोने प्रवाशांसाठी तिकीट काढल्यानंतर २० मिनिटांत प्रवास सुरू करणं, बंधनकारक केलं होतं. मेट्रो प्रवाशांची संख्या कशी वाढेल, याकडे महामेट्रो लक्ष देत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply