
Pune Metro : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील मेट्रोचा आता विस्तार होणार आहे. पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंळडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आज पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. वनाझ ते चांदणी चौक आणिकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज पुणे मेट्रोच्या २ नवीन उन्नत मार्ग निर्माणाला मंजुरी देण्यात आली. पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचा टप्पा २ वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर २अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर २ब) या प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
विद्यमान पुणे मेट्रो टप्पा-१ वनाझ-रामवाडीचा आता विस्तार होणार आहे. हे दोन उन्नत कॉरिडॉर १२.७५ किमी लांबीचे असतील आणि त्यात १३ स्थानके असतील. चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या जलदगतीने विकसित होणाऱ्या उपनगरांना मेट्रो जोडली जाणार आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रामवाडी ते वाघोली/ विठ्ठलवाडी कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज पुणे मेट्रोच्या २ नवीन उन्नत मार्ग निर्माणाला मंजुरी देण्यात आली. पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचा टप्पा २ वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर २अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर २ब) या प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. विद्यमान पुणे मेट्रो टप्पा-१ वनाझ-रामवाडीचा आता विस्तार होणार आहे. हे दोन उन्नत कॉरिडॉर १२.७५ किमी लांबीचे असतील आणि त्यात १३ स्थानके असतील. चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या जलदगतीने विकसित होणाऱ्या उपनगरांना मेट्रो जोडली जाणार आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अंदाजे खर्च ३६२६.२४ कोटी रुपये आहे. हा खर्च केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि बाह्य द्विपक्षीय/ बहुपक्षीय एजन्सींनी समान प्रमाणात वाटन घेणार आहे. पुणे मेट्रोच्या या नव्या टप्प्यामुळे पुण्यातील पूर्व-पश्चिम सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी चांदणी चौक ते वाघोली मेट्रो कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. या विस्तारांमुळे पौड रोड आणि नगर रोड सारख्या प्रमुख मार्गांवर गर्दी कमी होण्यास मदत होईल. पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा तयार झाल्यानंतर याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे आणि वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे.
पुणे मेट्रोचा विस्तार प्रमुख आयटी हब, व्यावसायिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि निवासी क्षेत्रांना सेवा देतील. ज्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वाटा आणि नेटवर्कमधील प्रवाशांची संख्या वाढेल. नवीन कॉरिडॉर जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनवर लाईन-१ (निगडी-कात्रज) आणि लाईन-३ (हिंजवडी-जिल्हा न्यायालय) सोबत देखील एकत्रित केले जातील. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सोपा होईल.
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel
