पुणे : मार्केट यार्डातील व्यापाऱ्याला ४० लाखांच्या खंडणीसाठी फोन; पैसे घेऊन कात्रज घाटात बोलावलं,

पुणे : मार्केट यार्डातील व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन अज्ञातांनी ४० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. व्यापाऱ्याच्या मोबाइल क्रमांकावर दोन दिवसांपूर्वी एकाने संपर्क साधला होता. ४० लाख रुपयांची खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. व्यापाऱ्याला खंडणीची रक्कम घेऊन कात्रज घाटात बोलाविण्यात आले. त्यानंतर घाबरलेल्या व्यापाऱ्याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात धाव घेतली.

खंडणीखोराने व्यापाऱ्याला कात्रज घाटात एके ठिकाणी थांबण्यास सांगितले होते. पोलिसांनी तेथे सापळा लावला होता. मात्र, खंडणीची रक्कम घेण्यासाठी कोणी आले नाही. मार्केट यार्ड पोलिसांकडून आराेपीचा शोध घेण्यात येत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *