Pune: पुण्यातील ८ बाजार समित्यांसाठी सरासरी ९४.२१ टक्के मतदान

पुणे - पुणे जिल्ह्यातील नऊपैकी आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या जागांसाठी शुक्रवारी (ता.२८) सरासरी ९४.२१ टक्के मतदान झाले. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी येत्या रविवारी (ता.३०) मतदान होणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक ९९ टक्के मतदान हे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी तर, सर्वात कमी म्हणजेच ७२.२८ टक्के मतदान हे पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झाले आहे.

दरम्यान, भोर आणि खेड या दोन बाजार समित्यांचा अपवाद वगळता उर्वरित सहा बाजार समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या शनिवारी (ता.२९) केली जाणार आहे.

भोर व खेड या दोन बाजार समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी ही मतदान संपल्यानंतर लगेचच शुक्रवारी (ता.२८) सायंकाळीच सुरु करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नऊ बाजार समित्यांमधील संचालक मंडळाच्या निवडीसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे.

यापैकी नऊ जागा उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच बिनविरोध झाल्या आहेत. आज मतदान झालेल्या बाजार समित्यांमध्ये पुणे (हवेली), बारामती, इंदापूर, दौंड, मंचर, खेड, नीरा आणि मावळ या आठ बाजार समित्यांचा समावेश आहे.

यापैकी पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही तब्बल २० वर्षांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच होत आहे.

त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणूक निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत याआधीच बिनविरोध झालेल्या नऊ संचालकांमध्ये मंचर (ता. आंबेगाव) येथील तीन, नीरा येथील दोन आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील चार संचालकांचा समावेश आहे.

बाजार समितीनिहाय झालेले मतदान (टक्केवारीत)

- पुणे (हवेली) --- ७२.२८ टक्के

- खेड --- ९९.०० टक्के

- इंदापूर --- ९६.११

- नीरा (ता. पुरंदर) --- ९४.६७

- मंचर (ता. आंबेगाव) --- ९७.८१

- मावळ --- ९८.२४

- बारामती --- ९७.३७

- भोर --- ९८.२०

बाजार समिती निवडणूक दृष्टीक्षेपात

- आज मतदान झालेल्या एकूण बाजार समित्या --- ०८

- आज मतदान न झालेली बाजार समिती --- जुन्नर

- याआधीच बिनविरोध झालेल्या जागा --- ०९

- आठ बाजार समित्यांसाठी झालेले सरासरी मतदान --- ९४.२१ टक्के

- सर्वाधिक मतदान झालेली बाजार समिती --- खेड

- सर्वात कमी मतदान झालेली बाजार समिती --- पुणे (हवेली)



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply