पुणे : शाळेच्या आवारात मुलीशी अश्लील कृत्य; अनोळखी तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

पुणे :‌ शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवार पेठेतील एका शाळेच्या आवारात ही घटना घडली.याबाबत शाळकरी मुलीच्या आईने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार एका अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळकरी मुलगी वर्गात निघाली होती. त्या वेळी तिने अनोळखी तरुणाकडे ‘दादा शाळा भरली का?’, अशी विचारणा केली. तेव्हा तरुणाने शाळेच्या जिन्यात मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती तिने आईला दिली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांना सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध झाले नाही. आरोपी तरुणाचे वय अंदाजे १८ ते २० वर्ष असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply