Pune : बांधकाम व्यावसायिकांच्या समस्यांवर तोडगा काढू ; डॉ. भागवत कराड

पुणे- बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यात येईल. तसेच, विकसित भारताच्या उभारणीमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्राने भरीव योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी (ता. २३) येथे केले.

राज्यातील बांधकाम व्यावसायिक, कर्ज पुरवठादार वित्तीय संस्था आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित अन्य व्यावसायिकांच्या पुण्याजवळील म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित एक दिवसीय परिषदेत डॉ. कराड बोलत होते. राज्यभरातून सुमारे अडीचशेहून अधिक प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले, कोरोनापश्चात काळात बांधकाम व्यावसायिकांसमोर विविध प्रकारची आव्हाने निर्माण झाली आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी सध्याची कर रचना, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कुशल मनुष्यबळाची कमतरता याबाबत मांडलेल्या समस्यांवर चर्चेद्वारे समाधानकारक तोडगा काढण्यास सरकार कटिबद्ध आहे.

जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करीत आहे. विकसित,आत्मनिर्भर भारताची उभारणी करणे हे सर्वांचे मुख्य ध्येय आहे. देशाच्या सकल उत्पन्नात बांधकाम क्षेत्राचा तिसरा क्रमांक आहे. या क्षेत्राने विकसित भारत निर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply