Pune : आज पुन्हा पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस ! शहर व परिसराला यलो अलर्ट

पुणे : शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणाची स्थिती असली तरी दुपारच्यावेळी उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. यामुळे पुणेकर घामाघूम होत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चक्क ४० अंशांच्या घरात गेला आहे.

पुढील दोन दिवस शहर व परिसराला यलो अलर्ट देण्यात आला असून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सोमवारी (ता. १७) देखील शहर व परिसरात दुपारी उन्हाच्या झळा आणि दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारे तसेच पावसाने हजेरी लावली.

शहरात ३८.२ अंश सेल्सिअस कमाल आणि १९.२ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. तर कोरेगाव पार्क, चिंचवड, ढमढेरे आणि शिरूर येथे पारा चाळीस अंशांदरम्यान होता. बुधवारपर्यंत (ता. १९) पुणे व परिसरात दुपारनंतर पावसाची शक्यता आहे

राज्यात कोकण वगळता काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार पोचला आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असून उष्णतेच्या लाटे सारखी स्थिती सध्या काही भागात जाणवू लागली आहे. सोमवारी (ता. १७) राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४३.२ अंश सेल्सिअस इतकी झाली.

दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंशांच्या पुढे आहे. तर जळगाव, सोलापूर, परभणी आणि बीड येथेही कमाल तापमान ४० अंशांदरम्यान नोंदविला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply