Pune : सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी दक्षिण मुख्यालयाला दिली भेट

पुणे : भारतीय सशस्त्र दलाचे सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी पुण्यातील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला भेट दिली. तसेच महत्वाच्या धोरणात्मक मुद्यांवर तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केले. अशी माहिती हेडक्वार्टर इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (एचक्यू आयडीएस) यांच्या वतीने ट्विटरवर देण्यात आली आहे.

या प्रसंगी जनरल सिंह यांच्यासमवेत नौदल आणि हवाईदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जनरल चौहान यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील संयुक्तता, सशस्त्र दलांचे परिवर्तन आणि स्वावलंबन या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. दक्षिण मुख्यालयाबरोबर भारत फोर्ज लिमिटेड आणि कल्याणी सेंटर फॉर टेक अँड इनोव्हेशन येथे ही भेट दिली. तसेच उत्पादन युनिट्स व प्रयोगशाळांची पाहणी करत येथील संरक्षण प्रकल्पांबाबत आढावा घेतला." एचक्यू आयडीएसच्या ट्विट मध्ये नमूद करण्यात आले.

या आधी जनरल चौहान यांनी मुंबई येथील नौदलाच्या 'वेस्टर्न नेवल कमांड'ला भेट दिली होती.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *