Pune : कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरचा सांगाडा कोसळला

कात्रज- कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कात्रज चौकात नवीन उड्डाणपूलाचे काम सुरू असताना, पिलरसाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा कोसळला. या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. यावेळी आजूबाजूला कोणीही नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

उड्डाणपुलाकरता एकूण वीस पिलर उभे करण्याचे काम सुरू असून त्यापैकी जवळजवळ सर्व पीलरचे काम सिमेंट काँक्रेट टाकून पूर्ण झाले आहे. त्यापैकी पिलर क्रमांक तेराचे आज काम सुरू होते. त्याच्यासाठी लोखंडी सांगाडा उभा करताना त्याचा तोल जाऊन तो कोसळला.

वंडरसिटी ते कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊलीनगर चौकापर्यंत या नियोजित उड्डाणपुलाची उभारणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (एनएचआय) केली जात आहे. या उड्डाणपुलासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या आवारातही खांब उभारण्यात आले आहे.

अशा प्रकारे लोखंडी सापळा कोसळल्याने नागरिकांतून शंका उपस्थित होत असून कामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काम निकृष्ट दर्जाचे होऊ नये ही नागरिकांची अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया

हा सांगाडा बांधण्याचे काम सुरू असताना हवेचा वेग जास्त असल्याने तो एका बाजूला झुकलेला आहे. अशा गोष्टी या होताच असतात. यातून कोणतीही त्रासदायक अडचण निर्माण होणार नाही. लवकरच सर्व सुरळीत होईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply