Pune : डीजेचा दणदणाट, वैतागलेल्या ज्येष्ठ नागरिकाने फोडली १० लाखांची साऊंड सिस्टीम

पुणे : डीजेच्या दणदणाटला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने थेट साऊंड सिस्टीम फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्येष्ठ नागरिकाने थेट लग्न समारंभात जाऊन वायर, मशीन, स्पीकर तोडून टाकत तब्बल १० लाख रुपयांचे नुकसान केले आहे. पुण्यातील कोंढवा खुर्द भागात बुधवारी घटना घडली. अब्दुल रिसालदार यांनी या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक सत्यबीर बंगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मार्च रोजी कोंढवा भागात असणाऱ्या कोरियंटल रिसॉर्ट अँड क्लब या ठिकाणी बॉलरूम मध्ये एक विवाह सोहळा संपन्न होत होता. विवाह समारंभ असल्यामुळे या ठिकाणी डीजे सिस्टीम लावण्यात आली होती. सत्यबीर बंगा यांचे घर या रिसॉर्ट पासून काही अंतरावर आहे. दरम्यान, या लग्न समारंभात सुरू असलेल्या डीजे साऊंड सिस्टीमच्या आवाजाचा त्रास होत असल्याने बंगा यांनी थेट रिसॉर्ट मध्ये विनापरवानगी प्रवेश केला.

ज्या ठिकाणी समारंभ सुरू होता त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सुरू असलेल्या साऊंड सिस्टीमच्या वायर तोडून टाकल्या. इतकचं काय तर रागाच्या भरात त्यांनी एलईडी ऑपरेटरचा लॅपटॉप देखील फोडला आणि इतर सगळ्या वस्तूंचे नुकसान केले. या सगळ्या साऊंड सिस्टीमची किंमत जवळपास १० लाख रुपये होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगा यांचे घर या रिसॉर्ट पासून काही अंतरावर आहे. या आधी देखील त्यांनी अशा अनेक कार्यक्रमात जाऊन गोंधळ घातले आहेत. बंगा यांच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम ४२७, ४५२ अन्वये अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply