Pune Lok Sabha Seat : पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षाचा दावा? कोण आहे इच्छुक आमदार?

Pune Lok Sabha Seat : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. अशात राज्यातील काही मतदारसंघांवर नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून दावा केला जातोय. यातच आता मविआमध्ये पुण्यातील लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा असल्याच्या चर्चा रंगल्यात.

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर इच्छुक आहेत अशी माहिती समोर आलीये. आज दिल्लीत लोकसभा समन्वयकांची बैठक आहे. या बैठकीसाठी रवींद्र धंगेकर आज दिल्लीत होते. यावेळी त्यांनी कांग्रेस मुख्यालयात भेट घेवून वरिष्ठ नेत्यांकडे आपली इच्छा व्यक्त केली आहे.

Amravati News : 'तलाठी भरती रद्द करा..' विद्यार्थ्यांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा;

सुरू असलेल्या चर्चेवरून माध्यमांशी संवाद साधताना धंगेकर म्हणाले की, होय, पक्षाने संधी दिली तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढणार. मी पक्षाकडे यापूर्वीच लोकसभेची उमेदवारी मागितली आहे.

ज्या पद्धतीने कसबाची पोटनिवडणूक जिंकली होती, त्यापेक्षा जास्त मतांनी पुण्याची लोकसभा जिंकू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आजच्या बैठकीत खासगीत बोलताना काही नेत्यांनी मला उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. भाजपच्या कारभाराला पुणेकर वैतागले आहेत, त्यामुळं त्यांना बदल हवा आहे. काँग्रेसच्या रूपाने पुणेकरांना बदल नक्की दिसेल, असं धंगेकर यावेळी म्हणाले.

आज सर्व जिल्हा निरीक्षकांची बैठक आयोजित केली होती. त्यात निवडणूक तयारी बाबत मार्गदर्शन करण्यात आलं. केंद्रातील भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी आमची आघाडी काम करत आहे. आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडणून आणायचे असं आजच्या बैठकीत ठरलं असल्याचं धंगेकरांनी सांगितलं.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply