Pune Lok sabha Election : मतदानासाठी सिंगापूरवरून आला, वणवण फिरला पण मतदार यादीत नावच नाही!

Pune Lok sabha Election : मतदान हा आपला राष्ट्रीय हक्क आहे आणि मतदानाचा हक्क बजावायलाचं हवा. मात्र अनेकजण अनेक कारणं सांगून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा कंटाळा करतात. मात्र पुण्यातील एक तरुण थेट सिंगापूरहून मतदानासाठी पुण्यात आला मात्र त्याचं मतदार यादीत नावच नसल्याने त्याचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं. 

Amit Shah : कलम ३७० ते रामलला दर्शन; अमित शहांनी राहुल गांधींना विचारले ५ प्रश्न

पुण्यातील आयडियल कॉलनीत राहणारा श्रेयस कुलकर्णी हा मतदानासाठी सिंगापूरहून पुण्यात आला. पुण्यात येण्याआधी त्यांच्या वडिलांनी अनेक ठिकाणी मतदार यादीत नाव बघितलं मात्र नाव सापडलं नाही. तरीही आपल्याला मतदान करता येईल या भावनेने श्रेयस काल पुण्यात आले. आज सकाळी ते पुण्यातील कोथरुड परिसरातील मतदार केंद्रावर गेले. त्या ठिकाणी त्यांनी आपलं नाव चेक केलं. मात्र त्यांचं नाव कोणत्याही यादीत सापडलं नाही. त्यामुळे श्रेयस यांना मतदान करता आलं नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. फॉर्म 17 भरुन मतदान करता येईस, असंदेखील सांगितलं होतं. मात्र तेही झालं नसल्याचं श्रेयस म्हणाले. मी आणि आमच्या सारखे काही तरुण वीर सावरकर चित्रपट पाहून आम्ही मतदान करायला आलो. पण साधारण तीस हजार लोकांची नावं डिलीट झाल्याची माहिती मिळाली. म्हणून आम्हाला मतदान करता आलं नाही, अशी खंत श्रेयस यांनी व्यक्त केली. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply