Pune : पुण्यात मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग चारचाकीवर कोसळला; येरवडा भागातील घटना

Pune : पुण्यातून मोठं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील येरवडा भागात मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कोसळल्याची घटना घडली आहे. मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग हा स्टेशन खालून जाणाऱ्या एका चारचाकीवर कोसळला आहे. पुण्यातील येरवडा भागात आज ८ वाजता ही घटना घडली आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार,पुण्यातील येरवडा येथे मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कोसळला आहे. पुण्यातील येरवडा येथे काम सुरू असलेल्या मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग हा स्टेशन खालून जाणाऱ्या एका चारचाकीवर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महा मेट्रोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुजोरा दिला आहे. नेमकी ही घटना कशामुळे घडली याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Kishori Pednekar : किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढणार? ईडीने मागवली कोविड घोटाळ्याची कागदपत्रं

तत्पूर्वी, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 'मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग एका कारवर पडला. ही घटना घडताना नागरिक असते तर मोठी दुर्दैवी घटना घडली असती. या स्टेशनच्या कामाचे संपूर्ण सुरक्षा ऑडिट करण्याची गरज आहे. या कामाच्या दर्जाची तपासणी करायला हवी. या घटनेला नेमका कोणाचा निष्काळजी कारणीभूत आहे, याची चौकशी करून कारवाई करावी'.

महा मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, पुण्यातील येरवडा भागात मेट्रो स्टेशनचे काम सुरु आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली, या पाहणी करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. आम्ही त्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या आहेत. चौकशीनंतर नेमकी ही घटना कशी घडली, याची माहिती समोर येईल. सध्या या व्यतिरिक्त कोणतही माहिती आमच्याकडे नाही'. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply