Pune Kondhwa Accident : पुण्यातील कोंढावा परिसरात ११ वाहने एकमेकांवर आदळली; एकाचा जागीच मृत्यू, ५ जखमी

Pune Kondhwa Accident : पुणे शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरात १० ते ११ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस, ट्रक, टिप्पर आणि इतर वाहने एकमेकांवर आदळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ४ ते ५ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना देखील समावेश असल्याची माहिती आहे. अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात अपघातांच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. गुरूवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास कोंढवा बुद्रुक स्मशानभूमीजवळ भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने स्कूल बससह अनेक वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ४ ते ५ जण जखमी झाले.

दरम्यान, या अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.

Pune Crime: मॅट्रिमोनिअल साईटवर ओळख, गोड बोलून तरुणीला हॉटेलवर नेलं; तरुणाने केलं भयानक कृत्य, पुण्यात खळबळ

पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार, चांदणी चौक शनिवारपासून खुला

पुण्यातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. कारण, वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आलेला चांदणी चौकातील नवा उड्डाणपूल उद्या म्हणजेच शनिवारी (१२ ऑगस्ट) वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तीन स्वतंत्र मार्गिका, सेवा रस्त्यांमुळे मुंबईकडे जाणे सुलभ होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार आहे. १० महिन्यांच्या विक्रमी काळात या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply