Pune Crime : पत्नीचा गळा चिरून केला खून, पती स्वतः चंदननगर पोलीस ठाण्यात हजर, पोलिसही चक्रावले...

Pune Crime : पती आणि पत्नीचे भांडण होणं ही काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा हाकताना नेहमीच पती-पत्नीमध्ये वाद होतात. अनेकदा हे वाद लगेचच मिटतात, तर काहीवेळा ते विकोपालाही जातात. यातून पुढे गुन्हेगारीच्या घटना घडतात. अशीच एक घटना पुणे शहरातून समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीची चाकूने वार करीत हत्या केली.

हत्येनंतर पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी केशव सीताफळे याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. लक्ष्मी सीताफळे( पाटीलबुवानगर, खराडी) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव भीमराव सीताफळे (वय 45) हा चंदनगर परिसरातील रहिवाशी असून त्याचा पत्नी लक्ष्मी हिच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

Seema Deo Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

वाद इतका विकोपाला गेला, की आरोपी केशव याने पत्नी लक्ष्मीला अमानुष मारहाण केली. मारहाणीनंतर त्याने चाकूने गळा कापून तिची हत्या केली. हत्येनंतर आरोपी केशव हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. मी पत्नीची हत्या केली, अशी कबूली त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *