Pune Hotels News : पुण्यात 'रात्रीस खेळ चाले'!, तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर मोठी कारवाई

Pune Hotels News : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता बदलतंय. पुणे सध्या शिक्षणाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठीच चर्चेत आहे. गुन्हेगारीचं प्रमाणही पुण्यात वाढत आहे. अशात आता पुणे शहरात रात्री १.३० वाजेनंतर देखील 'आफ्टर पार्टीज्' सुरु असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्सवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. 

MLA Disqualification : गोगावले म्हणाले, छ. शिवाजी महाराज सुरतेला गेल्याने मी गेलो, राऊत म्हणाले, गद्दारांनी शिवाजी महाराजांशी तुलना करू नये!

हॉटेल आणि पब्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मागील आठ दिवसात पुण्यातील 10 हॉटेल्स आणि पबवर ही कारवाई करण्यात आली आहे. 

कोणत्या हॉटेल्सवर कारवाई?

  • प्लंज, कोरेगाव पार्क

  • लोकल गॅस्ट्रो बार

  • एलरो

  • युनिकॉर्न

  • आर्यन बार, बालेवाडी

  • नारंग वेंचर

  • हॉटेल मेट्रो

  • लेमन ग्रास, विमाननगर

  • बॉलर

  • हॉटेल काकाज



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply