Pune Hoarding collapse News : पाच जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग, पुण्यातील अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई; 1000 होर्डिंग जमिनदोस्त

Pune Hording Accident: पिंपरी चिंचवडमधील किवळ्यात होर्डिंग कोसळल्याची दुर्देवी घटना घडली. ज्यामध्ये पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग आली आहे. त्यानुसार आता शहरातील अनाधिकृत होर्डिंगवर महानगरपालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरात 2485 अधिकृत फलक आहेत. तर एकूण 2629 अनधिकृत होर्डिंग होते. त्यापैकी आत्तापर्यंत 950 अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त केलेले आहेत. मात्र अद्याप ही 1679 अनधिकृत होर्डिंग शहरभर आहेत. या उर्वरित अनधिकृत होर्डिंगवर कारवाईसाठी आजपासून दहा पथकं शहरभर तैनात करण्यात येत आहेत.

पुणे शहरातील एमआयबीएम,कोंढवा हडपसर भागातील रोडवर असणारे अनेक अनधिकृत होर्डिंग्ज पाडले जात आहेत अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

किवळ्यात घडली होती दुर्घटना...

पिंपरी चिंचवडमध्ये  सोमवारी (दि. १७) संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वारा आणि पावसापासून बचाव करण्यासाठी सात ते आठ जण होर्डिंग खाली थांबले होते. यावेळी होर्डिंग अचानक कोसळले. या घटनेत पाच जणांचा मृत्यू तर काही जण जखमी झाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply