Pune Hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; अखेर अल्पवयीन तरुणाने सादर केला ३०० शब्दांचा निबंध

Pune Hit And Run Case : पुणे कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती. यानंतर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने ३०० शब्दांचा निबंध लिहिला आहे. या अल्पवयीन तरुणाने निबंध लिहून बाल न्याय मंडळापुढे सादर केला आहे.

पुण्यातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं होतं. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. पुण्यातील या हिट अँड रन प्रकरणामुळे गेल्या काही आठवड्यांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आजोबा, वडील आणि आईला अटक केली आहे.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर तीन वाहने एकमेकांना धडकली; भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

अल्पवयीन मुलाने दोघांना उडवल्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं. पुढे या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळापुढे सादर केलं होतं. त्यानंतर बाल न्याय मंडळाने अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती. त्यानंतर या अल्पवयीन मुलाने ३०० शब्दांचा निबंध बाल न्याय मंडळाने सादर केला आहे.

या प्रकरणातील शिक्षेच्या तरतुदीनुसार समुदेशन आणि वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासोबत काम करणे यासारख्या इतर अटींचे पालन करण्यासाठी देखील प्रक्रिया सुरु आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply