Pune Hit and Run Case : हिट ॲंड रन प्रकरणानंतर पुणे महापालिका अ‍ॅक्शन मोडवर; बेकायदेशीर पबवर बुलडोझर फिरवला

Pune Hit and Run Case : हिट ॲंड रन प्रकरणानंतर पुणे महापालिका अतिक्रमण विभाग अ‍ॅक्शन मोडवर आलं आहे. कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. बुलडोजर आणि जेसीपीच्या साह्याने अतिक्रमण विभागाने पबचे बांधकाम पाडले आहे.

कोरेगाव परिसरात असलेल्या बेकायदेशीर पब बांधकामावर ही कारवाई करण्यात आली आहे. थेट बुलडोझर आणि जेसीपीने हे बांधकाम पाडले जातं आहे. पुण्यातील हिट ॲंड रन प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गटाने देखील आक्रमक भूमिका घेतलीये. पुणे शहरात पबच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. येरवडा पोलीस ठाण्यावर आजा हा मोर्चा काढला जाणार आहे.

Pune Weather Update : रात्रीही पुणेकरांच्या जीवाची लाही लाही; रात्रीचं तापमान वाढलं!रात्रीही पुणेकरांच्या जीवाची लाही लाही; रात्रीचं तापमान वाढलं!

जर पब बंद झाले नाहीत तर पबची तोडफोड करणार, असा इशारा देखील ठाकरे गटाने दिला थेट. पुणे शहरातील पब बंद करा दोनच पबवर कारवाई का? असा सवालही ठाकरे गटाकडून पोलिसांना विचारण्यात आलाय.

पुण्यातील पबमध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांची भागीदारी

काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील पबवरून पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. हिट अँड रन प्रकरणानंतर पुण्यातील पब संस्कृती बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.अशातच पुण्यात वाढत चाललेली पब संस्कृती कायमची संपली पाहिजे, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पुण्यातील अनेक पबमध्ये अनेक पोलिसांचीच भागीदारी असून अनेक पोलीस खात्यातील पोलीस कर्मचारी हे नाचताना पाहायला मिळालेत, असा गंभीर आरोप देखील धंगेकर यांनी केल आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply