Pune Hinjewadi : पुण्यात आणखी एक दुर्घटना! IT पार्क लक्ष्मी चौकात महाकाय होर्डिंग कोसळले

हिंजवडी : किवळे होर्डिंग दुर्घटने पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. ३०) दुपारी साडे तीनच्या सुमारास आयटी पार्क हिंजवडीतील लक्ष्मी चौकात एक महाकाय होर्डिंग पडला. मात्र हा होर्डिंग अलगत दुकानांच्या शेड व रस्त्यावर पडल्याने सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.

लक्ष्मी चौकात मारुंजीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा होर्डिंग कोसळला. या दुर्घटनेत एका मोटारीचे किरकोळ नुकसान झाले आहे. घटनेनंतर बाघ्यांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी देखील झाली होती.

मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास सोसाट्याचा वारा व पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळातच हेलकावे खाणारे हे होर्डिंग खाली पत्रा शेडमध्ये असलेल्या दुकानांच्या समोर अन रस्त्यावर तिरपे कोसळले. हे होर्डिंग कोणाचे आहे? ते अधिकृत आणि की बेकायदा याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply