Pune Highway Traffic Update : कामशेत खिंडीत 6 अवजड वाहनं बंद पडली, पुण्याकडील वाहतूक खाेळंबली

Pune Highway Traffic Update : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मुंबईवरून पुण्याला जातानाच्या मार्गावर आज (मंगळवार) सकाळपासून वाहतुकीचा बाेऱ्या उडाला आहे. तब्बल सहा अवजड वाहने बंद पडल्याने महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत अवघड वळणावर अवजड वाहनं चढावावर जाताना एक नाही तर, तब्बल सहा वाहनं बंद पडली आहेत. दुसऱ्या वाहनांना अनेक अडचणी निर्माण झाल्याने जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती अडकून पडल्याचे दिसून येत आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान; आज पार पडणार महत्त्वाची सुनावणी

जुन्या मुंबई पुणे महामार्गावरुन सकाळी कामावर जाण्यासाठी अनेक जण या महामार्गाचा वापर करतात. आजही नेहमीप्रमाणे कामगार वर्ग घराबाहेर पडला. परंतु अवजड वाहने बंद पडल्याने महामार्गावरील वाहतुक खाेळंबली. परिणामी अनेक वाहनधारकांकडून कामावर जाण्यास उशिर हाेत असल्याची खंत व्यक्त हाेत हाेती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply