
Pune : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कथितरीत्या अपहरण झालेल्या मुलीला परत आणावे, या मागणीसाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. त्यानंतर झालेल्या निषेध सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू जनआक्रोश मोर्चा या नावाने हा मोर्चा भिगवण बस स्थानकापासून ते भिगवण पोलिस ठाण्यापर्यंत काढण्यात आला. त्यानंतर बस स्थानक परिसरात निषेध सभा झाली. मात्र या अपहरण प्रकरणाला नुकतेच नाट्यमय वळण लागले. कारण अपहरण झाल्याचा दावा करण्यात येत असलेल्या तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला असून मी माझ्या मर्जीने पळून आल्याचं या व्हिडिओत ती तरुणी म्हणत असल्याचं दिसत आहे. असं असलं तरी त्या तरुणीवर दबाव टाकून हा व्हिडिओ बनवण्यात आल्याचं सांगत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.
"मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ बनवून हा व्हिडिओ पोलीस आणि नातेवाईकांना पाठवला जात आहे. मी आता मुलीचा भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलीय. मुलीला वडील नाहीत. तिचं लग्न ठरलं होतं. पुढील दोन-चार दिवसात तिचं लग्न होणार होतं. अशा स्थितीत तिचं जबरदस्तीने अपहरण केलं आहे. त्यामुळे आज मी भिगवणला आलोय. भिगवण पोलीस स्टेशनला मी भेट देणार आहे. या घटनेनं सर्व हिंदू समाज संतापलेला आहे. मुलीचा हा व्हिडिओ कुठून आला, असं मी पोलीस अधीक्षकांना विचारलं. त्यांनी सांगितलं की, आरोपींनी वेगळं अॅप वापरलं आहे, त्यामध्ये लोकेशन दिसत नाही. त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलाय, नंतर कुटुंबाला व्हिडिओ पाठवणं, म्हणजे त्यांचं धाडस वाढलं आहे, त्याला वाचवण्याचा कोणीतरी प्रयत्न करतंय," असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी आरोपींच्या कुटुंबीयांवरही गंभीर आरोप केले आहेत. "आरोपीचे चुलते इथले गुंड आहे. त्यांची प्रचंड दहशत आहे. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत. मागे हिंदू मुलीच्या अपहरणातही त्याचा सहभाग होता. इथल्या हिंदू मंदिरावर ते कब्जा घेत आहेत, मंदिरातील मूर्त्यांची त्यांनी तोडफोड केलेली आहे. हे कसं काय होतंय? इतके दिवस पोलीस का गप्प आहेत. इतके गुन्हे असताना त्याच्यावर मकोका का लावलेला नाही, अशा सगळ्या मुद्द्यांवर मी पोलिसांशी चर्चा करणार आहे," असं पडळकर म्हणाले.
दरम्यान, स्वामी चिंचोलीचे माजी सरपंच अझहर शेख यांच्या मध्यस्थीने मुलीला पळून नेल्याचा आरोप आमदार पडळकर यांनी केला.
संग्राम जगतापही आक्रमक
‘या प्रकरणी कोणी दबाव टाकतील. कोणतेही व्हिडिओ येतील त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. संबंधित मुलगी उद्या हजर न झाल्यास पुन्हा २० तारखेला आंदोलनाची दिशा ठरवून आंदोलन केले जाईल,’ असं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप म्हणाले. या प्रकरणात पोलिस साथ देत नाहीत, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी माऊली हळनवर, शिवधर्म प्रतिष्ठानचे दीपक काटे आदींची भाषणे झाली.
तरुणीने व्हिडिओत नक्की काय म्हटलं?
‘जहीर शेख याच्याबरोबर आपण स्वखुशीने पळून आलो आहोत,’ असे ती तरुणी सांगत असल्याचे या व्हिडिओत दिसते. कोणीही डोळ्यांत मिरची पूड वगैरे फेकलेली नाही, असेही ती म्हणत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळाले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

