Pune Gangwar : मार्केटयार्डात दोन गुंडांच्या टोळ्यांमध्ये राडा, सातजणांना अटक

पुणे - दुचाकी वेगाने चालविल्याच्या कारणावरून दोन गुंडांच्या टोळ्यांनी एकमेकांवर तलवार आणि कोयत्याने केलेल्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी या भागात दहशत पसरविणाऱ्या दोन्ही टोळ्यांमधील सातजणांना अटक केली आहे. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

ही घटना मार्केटयार्डमधील आंबेडकरनगरमध्ये रविवारी भरदिवसा घडली. यासंदर्भात दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दिल्यावरून मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिलसिंग ऊर्फ सिंकदरसिंग टाक (वय २१, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्केटयार्ड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दत्ता भिसे (वय २९), नितीन भिसे (वय १९), विजय भिसे (वय २४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता भिसे याचा पुतण्या आकाश भिसे हा फिर्यादी टाक याच्या घरासमोरुन दुचाकी भरधाव वेगाने चालवत होता. त्यावेळी त्यांनी त्याला गाडी हळू चालव, असे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे दत्ता भिसे यांच्यासह सात-आठजण हातात कोयते व काठ्या घेऊन आले. त्यांनी टाक याला कोयता आणि काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *