Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात गणोशोत्सव काळात मेट्रो रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Pune : पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी गणेश मंडळांच्या अडचणी जाणून घेतल्या. डीजे परवानगी, मंडप परवाना, वाहतूक कोंडी या सगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीनंतर बोलता अजित पवार यांनी म्हटलं की, बैठकी चांगल्या पद्धतीने पार पडली. गणेशभक्तांची सर्वोतोपरी काळजी घेतली जाईल. मेट्रो प्रवास मी पण केला आहे. गणेशोत्सव काळात मेट्रो सकाळी ६ वाजत सुरू होऊन रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

कोणाच्याही मनात दुरावा निर्माण होऊ नये. सर्व सूचना आम्ही घेतल्या आहेत. सर्वांनी या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. मानाचे गणपती मानाचे गणपती आहेत. पण इतर मंडळाना पण चांगली वागणूक पोलिसांनी दिली पाहिजे, अशाही सूचना अजित पवारांनी दिल्या.

LPG Cylinders Price : मोदी सरकारची 'रक्षाबंधन' भेट! घरगुती सिलेंडरच्या किमती उद्यापासून 200 रुपयांनी कमी होणार

मनात धाकधूक होती

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, मनात धाकधूक होती की काही वाद होईल, पण तस झालं नाही. हसत खेळत बैठक पार पडली. सगळी नियमावली तुम्ही आपापसात एकत्र ठरवायला हवी. निर्णय रेटणं बरोबर नाही, त्यात वाद वाढू शकतो. 

पोलीस प्रशासन नक्की मदत करेल. कंट्रोल टॉवर सुरू करावे लागतील. पोलीस आणि महापालिका यांनी एकत्र येत निर्णय घ्यावे. गणपती विसर्जन मार्ग सोशल मीडियावर आधीच जाहीर करावी, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply