Pune Ganapati Festival 2023 : मोहन भागवत यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा; योगी आदित्यनाथही पुण्यात येणार?

Pune Ganapati Festival 2023 : गणेशोत्सव अवघा आठ दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टतर्फे यंदा अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. यंदा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा होणार असून योगी आदित्यनाथही पुण्यात येण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दरवर्षी प्रमाणे पुणे शहरात गणपती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचा देखावा नेहमीच पुणेकरांना आकर्षित करत असतो.

Maratha Reservation : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा सरकारचा निर्णय; तीन अधिकारीही निलंबित

यावर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंडळ ट्रस्ट यांच्यातर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिर साकारला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पुण्यात येणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या साठी 19 सप्टेंबरला सरसंघचालक पुण्यात असतील. तसेच त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पुण्यातील मानाच्या गणपतीचें दर्शन घेणार आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply