Pune : मोठी बातमी! पुण्याच्या कुख्यात गुंड गजा मारणेला सांगली कारागृहात हलवलं, प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त

Pune : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एकाला मारहाण प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई झालेला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला सांगलीच्या कारागृहात आणत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. कोथरूड परिसरात गजा मारणेच्या टोळीतील गुंडांनी तरुण अभियंत्याला बेदम मारहाण केली होती. मकोका अंतर्गत कारवाई करत ३ मार्चपर्यंत गजा मारणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आता एवढ्या मोठ्या गुंडाला सांगलीच्या कारागृहात का हलवले? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे याची सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सांगली कारागृहात त्याला नेण्यात आल्याने सांगली कारागृहाचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला. सांगली कारागृह प्रशासनाकडून याबाबत गोपनीयता बाळगली असून खबरदारी म्हणून गजा मारणेची पुण्यातील येरवडा कारागृहाऐवजी सांगलीतील कारागृहात रवानगी केल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे.

Pune Yerwada : येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात भ्रष्टाचार; चौकशी अहवालात धक्कादायक बाबी झाल्या उघड

भाजप कार्यकर्त्याला कोथरूडमध्ये मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे याच्यावर मोकका लावण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटकही केली होती. सांगली कारागृहात गजा मारणेची रवानगी करण्यात आली असून या कारागृहात चार बॅरॅक असून याच बॅरॅकमध्ये त्याला ठेवण्यात आलं आहे . त्याला ज्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे त्याच्या बाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यामुळे कारागृह प्रशासन आता अलर्ट मोडवर आले असून कारागृहातील सर्व वॉट्स टॉवरवर बंदोबस्त आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply