
Pune : पर्यटनासाठी लेह-लडाख येथे गेलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांची कार पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात राजस्थानात दिल्ली-मुंबई महामार्गावर बुधवारी झाला. कुणाल चोरडिया (वय २५, रा. शांतिबन सोसायटी, चिंचवड गाव), मयुरेश पाडाळे (वय २३, रा. म्हाळुंगे पाडाळे) आणि सिद्धान्त आल्हाट (वय २१, रा. थेरगाव) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव, वाकड आणि म्हाळुंगे परिसरातील दहा-बारा तरुणांचा ग्रुप २७ तारखेला लेह-लडाख आणि जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेला होता. फिरून झाल्यानंतर बुधवारी सर्व जण माघारी परतत होते. यातील कुणाल, मयुरेश आणि सिद्धान्त यांच्या कारचा राजस्थानात कोटा येथील केथून पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला. कार पुलावरून कोसळून तिघांचा जागीच मृत्यू झाला.
तिघांचे पार्थिव आज, गुरुवारी सकाळी शहरात आणण्यात येणार आहेत. मयुरेश आणि सिद्धान्त हे दोघे उच्च शिक्षण घेत होते; तसेच वडिलांच्या व्यवसायात मदत करीत होते. कुणाल हा इंदिरा कॉलेजमध्ये बीबीए अभ्यासक्रम शिकत होता. कुणालच्या मागे आई, वडील, मोठा भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
‘राजस्थान येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला असून, तरुणांच्या कुटुंबीयांसाठी आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे,’ असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.
बर्फवृष्टीमुळे पाच दिवस अडकलेले
प्रचंड बर्फवृष्टीमुळे कारगिल येथे सर्व तरुण आठ दिवसांपूर्वी अडकले होते. बर्फवृष्टी झाल्याने रस्ते बंद होते. त्यामुळे पाच दिवस ते एकाच ठिकाणी अडकले होते. त्यांना कोठेही जाता येत नव्हते. पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक नेत्यांनी ‘बीएसएफ’च्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वांना तेथून सुरक्षित बाहेर काढले होते. मात्र, यातील तिघांना मृत्यूने गाठल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
‘त्या’ मित्राला धक्का
अपघात झालेल्या मित्रांसमवेत आणखी एक तरुण होता. मात्र, मंगळवारी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो विमानाने घरी परतला. मात्र, आज सकाळी त्याला अपघाताची माहिती समजली आणि मानसिक धक्का बसला.
शहर
- Pune : पुढील दोन दिवस पावसाची शक्यता; राज्यातील 21 पेक्षा अधिक जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या कसं असेल हवामान
- Pune : पुण्यातील वाहनधारकांसाठी आता नवीन नोंदणी क्रमांकांचे पर्याय उपलब्ध; इंग्रजीतील तीन अक्षरांची सिरीज सुरू करणारे देशातील दुसरे शहर म्हणून पुण्याचा मान.
- एन. रघुरामन यांचा कॉलम:एआय अद्याप कामाच्या ओझ्यापासून सुटका करू शकलेले नाही
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
महाराष्ट्र
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- आरती जेरथ यांचा कॉलम:ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीवरून वादंग
- अर्घ्य सेनगुप्ता-स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:धार्मिक व्यवस्थेसाठीदेखील कोर्टाचा आधार कशामुळे?
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- आरती जेरथ यांचा कॉलम:ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीवरून वादंग
- अर्घ्य सेनगुप्ता-स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:धार्मिक व्यवस्थेसाठीदेखील कोर्टाचा आधार कशामुळे?
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- Mumbai : महाराष्ट्रात एलपीजी संकट! पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
- नांदेडच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरा! ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प जाहीर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल























Subscribe to my channel



