Pune Fraud: म्हाडाचे घर देण्याचे आमिष दाखवून जोडप्याने अनेकांना घातला लाखोंचा गंडा; पती- पत्नीविरोधात तक्रार दाखल

Pune Fraud News : सध्या सर्व प्रकारचे व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाण ऑनलाईन होते. त्यामुळे ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकारांमध्येही वाढ झाली आहे. पुणे शहरात ऑनलाईन फसवणूकीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. असेच एक नवीन प्रकरण समोर आले असून म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने दांपत्याकडून अनेकांची लाखोंची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हाडाकडून स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दांपत्याने काही लोकांकडून पैसे उकळून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याबाबत रेखा ऊर्फ कलावती भगवान कांबळे आणि तिचा पती भगवान कांबळे (रा. न्यू म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, हडपसर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Mumbai Crime : मुंबईतील क्रूर प्रकार! नवजात बाळाला इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली फेकलं

रेखा आणि तिच्या पतीने आपण म्हाडामध्ये कार्यरत असून, पुनर्वसनामधील घर स्वस्तात मिळवून देतो म्हणत लोकांना मोबाईलवर म्हाडाची घरे दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी घराच्या बुकिंगसाठी अगोदर १६ हजार रुपये द्यावे लागतील. घर मिळाल्यानंतर म्हाडामध्ये डिमांड ड्राफ्ट काढून पैसे भरावे लागतील. पैसे भरल्याशिवाय घराची चावी मिळत नाही, असे सांगून त्यांना न्यू म्हाडा कॉलनीतील घरे लांबूनच दाखवली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply