Pune Fire News : पुण्यातील कसबा पेठ परिसरातील तीन मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी

Pune Fire News : पुण्यातील कसबा पेठ परिसरातील मोटे मंगकार्यालयाजवळ असलेल्या तीन मजली इमारतीला सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच परिसरातील रहिवाशांनी आरडाओरड सुरू केली. काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र, भडका उडाल्याने आग नागरिक घाबरले.

आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने ही इमारत बंदस्थितीत असल्याने तेथे कुणी वास्तव्यास नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Jalana Breaking News : मोठी बातमी! अर्जुन खोतकरांच्या कार्यकर्त्यावर भरदिवसा गोळीबार; जालना हादरलं!

मात्र, आगीत इमारतीचं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली? याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. शॉर्ट सक्रीटमुळे आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यानी व्यक्त केला आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply