Pune Fire News : पुण्यात भीषण अग्नितांडव! फटाक्यामुळे एकाच दिवसांत १० ठिकाणी आग लागल्याच्या घटना

Pune Fire News : राज्यात दिवाळीच्या धामधूमीत अनेक ठिकाणी घर आणि दुकानांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यभरातील बहुतेक ठिकाणी लागलेल्या आगीमुळे घर-दुकान मालकांचं अतोनात नुकसान झालं आहे. पुण्यातही अनेक ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. पुण्यात फटाक्यांमुळे १० ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. 

पुण्याच्या शुक्रवार पेठेत फटकांच्या ठिणगीमुळे लाकडचा जुना वाडा पेटल्याची घटना घडली आहे. शुक्रवार पेठेतील वाडा लाकडी असल्यामुळे फटाक्यांच्या ठिणग्यांनी रौद्ररुप धारण केलं. वाड्याला आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली.

Mumbai Air Pollution : फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबई-पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली; दिल्लीत श्वास घेणंही कठीण

नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवलं. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचताच या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात सुरुवात केली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं.

आग कशी लागली?

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या निमित्ताने काही नागरिक याच वाड्याच्या परिसरात फटाके फोडत होते. याच फटाक्यांमुळे लाकडी वाड्याला आग लागली. जुना वाडा लाकडी असल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केलं. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.

पुण्यात फटाक्यांच्या कारणाने १० ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे गॅलरीत, टेरेसवर पेट घेण्यासारख्या वस्तू ठेवू नका, असं आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply