Pune Fire: पुण्यात गादीच्या कारखाण्याला भीषण आग, अन्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल

Pune Fire News: पुण्यात गादीच्या कारखाण्याला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या कारखाण्यात गादीसाठी वापरण्यात येणारे स्पंज असल्याने काही वेळात आग प्रचंड भडकली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील वारजे रामनगर भागात असलेल्या गादीच्या कारखान्याला ही आग लागली आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाची तीन वाहनं दाखळ झाली आहे. आगीमुळे उंचच्या उंज धुराचे लोट दिसत आहेत. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

पुणे अग्निशमन दलाची तीन वाहने घनटास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाटी प्रयत्न केले जात आहेत. गादीचा कारखाना असल्याने यातील स्पज मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार कारखाना बंद होता. घटनची माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी आणि वारजे पोलीस घटनास्थळी पोचले आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *